Bhalchandra Nemade Majha katta : आपण गुलाम झालो आहोत. आपण कुठे आहोत हे देखील आपल्याला कळतही नाही. दीड दोन लाख रुपये भरुन तुम्ही पोर इंग्रजी शाळेत घालता. मुलं मराठी शाळेत घाला असे वक्तव्य ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांनी केलं आहे. अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर आलं आहे. मराठी शाळा चांगल्या करा, सध्या मराठी शाळा बंद होत असल्याचेही नेमाडे म्हणाले. हल्ली मुलं आपल्या मातृभाषेत बोलत नाहीत असंही नेमाडे म्हणाले. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी आज एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले. 


साहित्य संमेलनाच्या गर्दीत जायचं नाही असं मी ठरवलं असल्याचे नेमाडे म्हणाले. जास्त प्रसिद्धीच्या झोतात घुसणं हे काही जास्त बरोबर नाही असं मला वाटत असल्याचे नेमाडे म्हणाले. आज कोणीही वृत्तमानपत्राबाबत चांगल बोलत नाही. वृत्तमानपत्र हे जगाची खिडकी नाही. जगातलं चांगल दाखवणारी ही खिडकी नसल्याचे नेमाडे म्हणाले. जपानमध्ये मुलगी झाली फेलोशीप मिळते. महाराष्ट्रात देखील असे केले पाहिजे. यावर पेपरात काही येत नाही असे नेमाडे म्हणाले. आपली डोकी पेररामुळेच आऊट झाली असल्याचेही नेमाडे म्हणाले. पूर्वी आपण बोरं, कवठं, उमरं, ऊस, पेरु खात होतो. घरी वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असायच्या असेही नेमडा मेहणाले. वेगवेगळ्या प्रकारचे तीळ होते. आज तीळ मिळतच नाहीत असे नेमाडे म्हणाले. त्यामुळं आपला मेंदू वाढल्याचे नेमाडे म्हणाले.


आदिमानव 300 प्रकारच्या भाज्या खात होता, त्यामुळं आपल्या मेंदूची प्रगती झाली


आदिमानव 300 प्रकारच्या भाज्या खात होता. यामुळं आपल्या मेंदूची प्रगती झाल्याचे भालचंद्र नेमाडे म्हणाले. आपण हजार गोष्टी खाल्ल्या आहेत. सध्या आपण मेंदूला जे हवं ते देत नसल्याचे नेमाडे म्हणाले. युनोनो कडधान्य खाल्ले पाहिजेत असं सांगितल्याचे नेमाडे म्हणाले. 


मला मराठी भाषेची काळजी वाटत नाही, कारण...


मला मराठी भाषेची काळजी वाटत नाही. कारण आजही लोकसंख्येनुसार मराठी जगातील 10 व्या क्रमांकाची भाषा असल्याचे नेमाडे म्हणाले. 12 ते 13 कोटी लोकसंख्येमध्ये  दोन चार लोक चांगले निघू शकतील ते भाषेची स्थिती बदलतील असे नामडे म्हणाले. संस्कृत नव्हती तेव्हापासून मराठी भाषा आहे असे नेमाडे म्हणाले. आपल्याकडे मराठी भाषेतीली किती मोठ्या साहित्यिक कवी आहेत. हे सगलं सोडून आपण इंग्रजी लेखीकांच्या नादाला का लागायचं? असा सवाल नेमाडेंनी केला.