Bhalchandra Mungekar : गोळवलकर यांनी राज्यघटनेचा उल्लेख गोदडी असा केलेला आहे. एक पक्ष एक पंथ एक धर्म अशी हिटलरला अभिप्रेत असलेली भूमिका प्रत्यक्षात भाजप आणू पाहात आहे. भारतानं धर्मनिरपेक्षामुळे आपलं अस्तित्व टिकून ठेवलेलं आहे. फक्त मी म्हणजे देश अशी भूमिका आहे, हे सरकार फाॅर द ईडी, बाय द ईडी, असं असल्याची घणाघाती टीका अर्थतज्ज्ञ आणि काँग्रेस नेते भालचंद्र मुणगेकर यांनी केली. भालचंद मुणगेकर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही सडकून टीका केली. 


भाजपला कसा फायदा होईल अशी वंचितची भूमिका 


भालचंद्र मुणगेकर यांनी प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिकेवरून सडकून टीका केली. ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांनी जी भूमिका घेतली महाविकास आघाडीकडून बाहेर पडण्याची ती चुकीची आहे. भाजपला कसा फायदा होईल आणि अनुकूल ठरेल अशी वंचितची भूमिका आहे. महाविकास आघाडीला दुबळं करण्याची भूमिका वंचितनं घेतली. त्यामुळे दलित समाजात असंतोष आहे. 


मविआतून स्वतंत्र लढून ते भाजपचा पराभव करणार आहेत का?


भालचंद्र मुणगेकर यांनी आंबडेकर यांना मविआतून स्वतंत्र लढून ते भाजपचा पराभव करणार आहेत का? अशी विचारणा केली. ते म्हणाले की, वंचितला आघाडीत घेण्याची चर्चा सुरु झाली तेव्हा 12-12-12-12 ची मागणी केली. वंचितनं विधानसभेला 234 जागा लढवल्या आणि त्यांची एकही जागा निवडून आलेली नाही. लोकसभेत त्यांना 6.6 टक्के मतं मिळाली होती. विधानसभेत 4.6 टक्के फक्त मतं त्यांना मिळाली. औरंगाबादची एकच जागा लोकसभेत निवडून आली. त्यांनी पुढे सांगितले की, महाविकास आघाडीचे 9 उमेदवार लोकसभेत पडले. मताधिक्य वंचित ऐवढं त्यांना मिळालेलं होतं. प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं किमान समान कार्यक्रम पाहिजे, पण प्रकाश आंबेडकरांना खरोखरच मविआत यायचं होतं की नाही? अशी विचारणा त्यांनी केली. 


नरेंद्र मोदी राज्यघटनेचा उल्लेख करत नाहीत


2014-24 पर्यंत भारतीय राज्यघटना, मूल्य, संकल्प, तिचा आवाका आणि त्याची संपूर्ण व्यवस्था उद्धवस्त करत आहे. कधीही नरेंद्र मोदी राज्यघटनेचा उल्लेख करत नाहीत. आपल्या भाषणात संविधानाचा उल्लेख करत नाही, स्वयंसेवक संघाचा भारतीय संविधानाला विरोध आहे, आॅर्गनायझरमध्ये लेख आहे की स्वातंत्र्य आम्हाला मान्य नाही. सर्वसामान्य माणूस सार्वभौम होईल याला त्यांचा विरोध असल्याचे मुणगेकर म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या