मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. आता या प्रकरणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. 'प्रत्येक महापुरुषामागे एक स्त्री उभी असते, पण ती पत्नीच असते असं नाही', या शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी धनंजय मुंडे यांना कोपरखळी मारली आहे. अर्थात हे वक्तव्य करताना श्रीनिवास पाटील यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेतलेलं नाही.


सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. सदर तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला आहे.


धनंजय मुंडे यांच्या विरोधात आरोप करणाऱ्या महिलेनं तक्रार दाखल केली होती. परंतु, याप्रकरणी कोणाचाही जबाब नोंदवण्यात आला नव्हता. परंतु, आता या प्रकरणी जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. आता धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडे यांचा जबाब मुंबई पोलीस नोंदवणार आहेत. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की, एखादी महिला तिच्यावर झालेल्या अत्याचारांविरोधात तक्रार दाखल करत असेल, तर त्याबाबत तक्रार दाखल करुन त्यासंदर्भातील चौकशी तत्काळ सुरु करण्यात यावी.


पाहा व्हिडीओ : महान पुरुषामागे एक स्त्री असते, पण ती पत्नीच असते असं नाही : श्रीनिवास पाटील



धनंजय मुंडे यांना दिलासा, तूर्तास राजीनामा घेणार नाही


बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बलात्काराचा आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला होता. विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्या मागणी केली होती. परंतु मुंडे यांना पक्षाकडून तूर्तात तरी दिलासा मिळाला आहे.


रेणू शर्मा यांनी मुंडेंवर काय आरोप केलेत?


रेणू शर्मा या महिलेने ट्विटरवरुन धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत मुंडे यांनी लग्नाचं अमिष दाखवून फसवणूक केली. तसेच बलात्कार करून शारीरिक शोषण केल्याचा आरोप शर्मा यांनी केलाय. पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यानंतर रेणू शर्मा यांनी सलग ट्विट करत पुन्हा काही प्रश्न उपस्थित केले आहेत. धनंजय मुंडे यांनी मला ट्विटरसहीत सगळीकडे ब्लॉक करण्यामागचं कारण काय? असा सवाल रेणू यांनी केला आहे. पोलिसात तक्रार दाखल करताच मुंडे यांनी पुन्हा अनब्लॉक केल्याचंही शर्मा यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केले आहे.


महत्त्वाच्या बातम्या :