बीड : बीडच्या सिरसाळातील एका मोकळ्या मैदानात जमिनीखालून लाव्हासदृश्य पदार्थ बाहेर पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जमिनीतून लाव्हासदृश्य पदार्थ बाहेर पडतानाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर आणि घटनेची माहिती पसरल्यानंतर हा लाव्हासदृश्य पदार्थ पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत.

दरम्यान याबाबतीत प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी हा सगळा प्रकार वीजेची तार पडल्याने झाला असल्याचे सांगितले. काल संध्याकाळी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. याचदरम्यान वीजेची तार पडली असल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान, काल संध्याकाळी कोल्हापुरात गडगडाटी पाऊस झाला. करवीर तालुक्यातील शिये गावात वीज पडल्याने शिवारातील झाडांना आग लागली. आगीच्या या दुर्घटनेत कोणतीही जीवितहाणी झालेली नाही.

व्हिडीओ पाहा