बीड : एसटी महामंडळाने बीड ते मुंबई शिवशाही स्लीपर सेवा सुरु केली आहे. बीडमधून दररोज रात्री साडे आठ वाजता, तर मुंबईहून दररोज रात्री साडे आठ वाजता ही बस सुटेल. या 30 आसनी बससाठी आजपासून (मंगळवार, 8 मे) आरक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एसटी महामंडळ खाजगी वाहतुकीला तोडीस तोड उत्तर देत आहे. राज्यात सुरु केलेल्या शिवशाही बससेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी शिवशाही ही वातानुकूलीत सेवा सुरु करण्यात आली आहे. बीड-मुंबई शिवशाहीसाठी तिकीट बीड-पनवेल 860 रुपये बीड-वाशी 915 रुपये बीड-कुर्ला 942 रुपये बीड-दादर 956 रुपये बीड-मुंबई 968 रुपये स्लीपर कोचमध्ये मिळणाऱ्या सुविधा पूर्णतः वातानुकूलीत मोफत वायफाय प्रत्येकाला ब्लँकेट-पिलो मोबाईल चार्जिंगची सुविधा आगप्रतिबंधक यंत्रणा सीसीटीव्ही कॅमेरे जीपीआरएस सिस्टीम तिकीट दर 13.10 रुपये प्रति टप्पा (6 किमीचा एक टप्पा) संबंधित बातम्या :

एसटी महामंडळाची किफायतशीर दरात स्लीपर बस, पाच मार्गांवर सेवा सुरु

या पाच मार्गांवर स्वस्त दरात एसटीची स्लीपर बस धावणार!