बीड : उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांचा 76 मतांनी विजय झाला. मात्र धस यांना मिळालेली मतं कुठून आली, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण या प्रश्नाच्या उत्तरामधील एक पदर एका फोटोमध्ये आहे. हा फोटो आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे भारतभूषण क्षीरसागर यांच्यासोबतचा. विजयानंतर भारतभूषण क्षीरसागर यांनी सुरेश धस यांचा सत्कार करुन गुलाल खेळला. यातूनच सुरेश धस यांना पडलेली विक्रमी मतं कुठून आली, या उत्तरातली एक चुणूक दिसून येते.
विशेष म्हणजे या छोट्याशा सत्कार सोहळ्यामध्ये भारतभूषण यांनी दिलेली प्रतिक्रिया तर अतिशय बोलकी होती. ते म्हणाले की "सुरेश धस यांचा विजय म्हणजे दुष्ट प्रवृत्तीच्या विचारावर मिळवलेला विजय आहे."
उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत सुरेश धस यांना 527 मतं, अशोक जगदाळे यांना 451 मतं मिळाली. तर तब्बल 25 मतं बाद झाली.
विधानपरिषद: संख्याबळ नसूनही सुरेश धस कसे जिंकले?
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर हे मागील वर्षभरापासून नाराज आहेत. त्यामुळेच जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यक्रमांना या दोन्ही नेत्यांची कायम अनुपस्थिती असते. एकीकडे राष्ट्रवादीकडून पुतण्या संदीप क्षीरसागर यांना मिळणारं बळ तसंच बीडमध्ये धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीच्या काही बड्या नेत्यांकडून क्षीरसागरविरोधी कृत्याला मिळणारं खतपाणी, यामुळेच जयदत्त आणि भारतभूषण क्षीरसागर हे मागील अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचं पाहायला मिळत होतं.
कालच्या पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांच्यासाठी पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेच्या खांद्याला खांदा लावून प्रचार केला. अर्थात जयदत्त क्षीरसागर मात्र या पूर्ण निवडणूक प्रक्रियेतून अलिप्त होते. पण असं असलं तरी भारतभूषण क्षीरसागर यांनी कालच सुरेश धस यांच्या सत्काराचा कार्यक्रम बीड नगरपालिकेमध्ये जाहीर केला. एवढंच नाही तर स्वतः सुरेश धस यांच्यासोबत भारतभूषण यांनी गुलाल ही खेळला. यावरुन स्पष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या नाराज नेत्यांमुळेच सुरेश धस यांना विजयाची लॉटरी लागली.
उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद : सुरेश धस विजयी
धनंजय मुंडे कितीही म्हणत असले की राष्ट्रवादी काँग्रेसचं एक ही मत फुटलेलं नाही तर मग प्रश्न उपस्थित होतो की इतक्या मोठ्या उत्सवांमध्ये सामील होणारे भारतभूषण आणि जयदत्त क्षीरसागर यांची मतं कोणाला पडली हे उघड सत्य आहे.
मागे काही दिवसांमध्ये तर जयदत्त क्षीरसागर यांची भाजपाच्या नेत्यांशी म्हणजे पंकजा मुंडे आणि विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली जवळीक लपून राहिलेली नाही. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये आलेल्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी जाऊन चहापाणी केलं, त्याचवेळी क्षीरसागर आणि भाजपा यांच्यातील संबंधाची उघड उघड चर्चाही झाली होती.
उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषद निवडणूक अंतिम निकाल
527 सुरेश धस
451 अशोक जगदाळे
25 बाद
एकूण फरक 76
सुरेश धस विजयी घोषित
‘बेटा बेटा होता है और बाप बाप’, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्ला
धस यांचा विजय म्हणजे दुष्ट प्रवृत्तीवरील विजय : क्षीरसागर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jun 2018 11:51 AM (IST)
विशेष म्हणजे या छोट्याशा सत्कार सोहळ्यामध्ये भारतभूषण यांनी दिलेली प्रतिक्रिया तर अतिशय बोलकी होती. ते म्हणाले की "सुरेश धस यांचा विजय म्हणजे दुष्ट प्रवृत्तीच्या विचारावर मिळवलेला विजय आहे."
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -