बीड : बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच दोन्ही नेत्यांमधील गटबाजीचं दर्शन घडलं. बीडमध्ये महाजनादेश यात्रा आल्यानंतर रथावर मुख्यमंत्री आणि मेटे उपस्थित होते. मात्र पंकजा मुंडेंनी तिथे जाण्याचं टाळलं आणि फ्रण्ट सीटवर बसून राहिल्या.
बीडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी विनायक मेटेंनी मंडप उभारला होता. यावेळी महाजनादेश यात्रेच्या गाडीवर केवळ विनायक मेटे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच दिसले. मेटेंनी 3 ते 4 मिनिटं मनोगत व्यक्त केलं. परंतु मेटेंना टाळण्यासाठी पंकजा मुंडे गाडीच्या फ्रण्ट सीटवर बसून राहिल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मेटे आणि उपस्थितांचे आभार मानले आणि महाजनादेश यात्रा पुढे सरकली.
विनायक मेटे मुख्यमंत्र्यांसोबत महाजनादेश यात्रेच्या गाडीवर असताना, पंकजा मुंडे यांच्या चेहर्यावरील हावभाव मेटे आणि त्यांच्यातील संघर्ष स्पष्टपणे दाखवणारा होता. एकूणच मुख्यमंत्र्यांसमोर विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आला आहे.
पंकजा मुंडे आणि विनायक मेटेंमधील संघर्ष मुख्यमंत्र्यांसमोरच उघड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Aug 2019 10:30 AM (IST)
बीडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी विनायक मेटेंनी मंडप उभारला होता. यावेळी महाजनादेश यात्रेच्या गाडीवर केवळ विनायक मेटे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच दिसले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -