Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेत गुप्त चर्चा केली. ही भेट पुण्यातील जुन्नरमध्ये झाली. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. संदीप क्षीरसागर हे जुन्नरमध्ये येऊन संदीप क्षीरसागर यांना का भेटले असावेत? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. मात्र, या सर्व चर्चांवर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतित्युत्तर दिलं आहे. 


नेमकं काय म्हणाले अजित पवार 


बीडचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीसागर यांनी आज अजित पवारांची भेट घेतली. या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे. या भेटीत दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची काही चर्चा झाली का? या भेटीमागचं कारण काय? असे प्रश्न उपस्थित होत असताना उरमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीमागचं कारण सांगितलं आहे. बीड सारख्या शहरात 21 दिवस झालं पिण्याचं पाणी नाही. म्हणून तो मला शोधत इथं आला असल्याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं. विरोधी पक्षाचा आमदार मला भेटला म्हणून कोणत्याही ब्रेकिंग न्यूज चालवू नका, असेही अजित पवार म्हणाले.


चंद्रकांतदादा पाटील पुण्याचे पालकमंत्री होते, त्यावेळी मी देखील त्यांना भेटत होतो


मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. गेल्या 21 दिवसापासून बीड जिल्ह्यात पिण्याचं पाणी आलं नाही. याबाबत भेट घेण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर माझ्याकडे आला होता असे अजित पवार म्हणाले. लोकप्रतिनिधी असल्यामुळं भेटनं गैर नाही. चंद्रकांत दादा पाटील हे ज्यावेळी पुण्याचे पालकमंत्री होते, त्यावेळी मी देखील त्यांना भेटायला जात होतो असे अजित पवार म्हणाले. बीड सारख्या एवढ्या मोठ्या शहराला 21 दिवसानंतर पाणी जात आणि तातडीची गरज म्हणून ते मला भेटायला आल्याचे अजित पवार म्हणाले. यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे अजित पवार म्हणाले. 


दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून अनेकदा शरद पवार गटाचे नेते संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या. मात्र, अजित पवार यांनी या भेटीबाबत खुलासा केला आहे. 
 



महत्वाच्या बातम्या:


खरे काय ते सांगा? मुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादांनी दिलेल्या आकडेवारीत तफावत, जितेंद्र आव्हाडांचा सवाल