Pravin Darekar on Sanjay Raut : राज्यासमोर संजय राऊत (Sanjay Raut) हा मोठा प्रश्न आहे. त्याचं उत्तर सापडत नाही. रोज सकाळी उठून तीच कॅसेट लावतो, असं म्हणत भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर हल्लाबोल केला. कडवट शिवसैनिक जातो, तेव्हा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. अजून वेळ गेलेली नाही. उरली सुरली सेना भक्कम करावी असेही दरेकर म्हणाले.
भास्कर जाधवांचे बंधू शिवसेनेत प्रवेश करतायेत, हे भविष्याचे संकेत
प्रश्न सत्तेचा नाही तर विश्वासाचा आहे. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना एकही आमदार फोडू शकला नाहीत. नगरसेवक गेला नाही असेही दरेकर म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचे बंधू शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करत असतील तर ते भविष्याचे संकेत असावेत असेही दरेकर म्हणाले. दरम्यान, नुकताच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला राम राम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर कोकणातील आणखी काही महत्वाचे नेचे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये भास्कर जााधव तसेच माजी आमदार वैभव नाईक यांचे नाव घेतले जात आहे. दरम्यान, कोकणात ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहे. अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानं कोकणात ठाकरे गटाची ताकद कमी होत असल्याची चर्चा सुरु आहे.
सुरेश धस हे पारदर्शी नेते
सुरेश धस हे पारदर्शी नेते आहेत. त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असं नाही असेही दरेकर म्हणाले. मी विषय सोडणार नाही. हे त्यांनी सांगितलं आहे. पक्षाच्या नेत्यांनी बोलवलं तर जाणं हा शिस्तीचा भाग असल्याचे प्रविण दरेकर म्हणाले. गिरगाव, शिवडी वरळी लालबाग या मराठमोळ्या परिसरात स्वयंपूर्ण विकास आजच होतोय असं नाही. मुख्यमंत्र्यांनी अनेक सवलती दिल्या आहेत. 1600 प्रकल्पांचे प्रस्ताव मुंबई बॅंकेकडे आले आहेत असंही दरेकर म्हणाले. मुख्यमंत्री चारकोपला येत आहेत. स्वयंपूर्ण विकासाला चालना देण्यासाठी ते येणार आहेत. 160 च्या तिप्पट जागा मिळायला गिरगावमध्ये हरकत नाही. हा चांगला भाव आहे. किमान 500 ची जागा मिळू शकते असेही दरेकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: