बीड : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे गृहमंत्री म्हणून नापास झालेत, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केलीये. सुषमा अंधारे यांनी पुण्यामध्ये पोलिसांच्या गाड्या थांबवून कैद्यांना पाकिटं वाटली जात असल्याचा आरोप केला. त्यानंतर आरोप आणि प्रत्यारोपाचं राजकारण सुरु झालं. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील सुषमा अंधारे यांनी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचं म्हटंल.  


सुषमा अंधारेंनी एक व्हिडिओ ट्विट करत पोलिसांच्या गाडीतून कैद्यांना पाकिटं वाटली जात असल्याचा आरोप केला. उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली पुन्हा एकदा गृहकात्याची अब्रू चव्हाट्यावर आली, असं म्हणत सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं. दरम्यान अंधारेंनी यांनी केलेल्या आरोपाची सखोल चौकशी करण्यात येईल, असं देवेंद्र फडणवीसांनी दिला. 


सुषमा अंधारे काय म्हणाल्या?


यावर खालच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून चालणार नाही, तर हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादानेच घडला असल्याचं सुषमा अंधारे यांनी  म्हटलं. दरम्यान  ललित पाटील ड्रग्स प्रकरणांमध्ये देखील त्यांनी ससूनचे अधिष्ठाता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर  नेमणूक रद्द करण्यात आली.  मात्र ही सरकारची खेळी असून सरकार या ड्रग्स प्रकरणांमध्ये अनेक लोकांना पाठीशी घालत असल्याचं आरोप त्यांनी केला. 


सत्यता पडताळून पाहिली जाईल - फडणवीस


सुषमा अंधारेंनीच काय इतर कुणीही तक्रार केली तर त्याची नोंद घेतली जाईल. त्याचप्रमाणे त्या प्ररकरणामधील सत्यता पडताळून त्याची नोंद देखील घेतली जाईल, असं म्हणत सुषमा अंधारेंच्या आरोपांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं. त्याप्रमाणे ललित पाटील प्रकरणातील संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात आलीये, त्यामुळे आता त्यावर बोलण्याचा अधिकार त्यांना नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. 


नेमकं प्रकरण काय? 


ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक ट्वीट केलेल्या व्हिडिओमुळे चांगलीच खळबळ माजली. या व्हिडिओमध्ये पोलीसांच्या गाडीतून कैद्यांना पाकिटं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच ही पाकिटं नेमकी कशाची आहेत, याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली. त्याचप्रमाणे त्यांंनी राज्याच्या गृहविभागावर देखील टीका केली.


हेही वाचा : 


काल निवडणूक आयोगात मोठे आरोप, आज बडे नेते शरद पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?