बोर्डाच्या नियमावलीनुसार अशी एखादी दुर्घटना घडते, तेव्हा सरासरी गुण देण्याचा नियम आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचं औरंगाबाद बोर्डाच्या अध्यक्षा सुगदा पुन्ने यांनी सांगितलं. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना इतर विषयात जे गुण मिळाले आहेत, त्या सरासरीने जळालेल्या पेपरला गुण मिळणार आहेत.
दरम्यान, हा निर्णय विद्यार्थ्यांना किती मान्य होतो, हे पाहावं लागेल. कारण, ज्या विद्यार्थ्यांना जळालेला पेपर अवघड आणि इतर पेपर सोपे गेले आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय फायद्याचा, तर ज्या विद्यार्थ्यांना ईतर पेपर अवघड गेले आहेत आणि हा पेपेर सोपा गेलाय त्यांच्यासाठी मात्र हा निर्णय अन्यायकारक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संबंधित बातम्या :
बीडमधील उत्तर पत्रिका जळीतकांड : 14 कर्मचाऱ्यांचं निलंबन