85 टक्के न मिळाल्यानं दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 06 Jun 2016 02:21 PM (IST)
दापोली: रत्नागिरी-दापोली तालुक्यातील आपटी येथे नुकतंच दहावी पास झालेल्या एका विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दहावीच्या परीक्षेत 80 टक्के गुण मिळूनही या विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचं समजतं आहे. आज दुपारी 1 वाजता दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. मात्र, या निकालात अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाल्यानं विद्यार्थिनीनं आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. प्राची घडवले असं या विद्यार्थिनीचं नाव असून तिनं राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. दहावीच्या परीक्षेत 85 टक्क्यांची तिला अपेक्षा होती. मात्र, तिला 80 टक्के मिळाल्यानं तिनं थेट टोकाचंच पाऊल उचललं.