बीड: बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 2 कोटी 90 लाखांच्या घोटाळ्याप्रकरणी आज कोर्टानं तब्बल 16 जणांना दोषी ठरवलं असून त्यांना प्रत्येकी 5 वर्ष शिक्षा आणि 60 हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आला आहे.
घाटनांदूरच्या शेतकरी सहकारी तेलबिया संस्थेला बेकायदेशीररित्या कर्ज दिल्याप्रकरणी राजाभाऊ मुंडे यांच्यासहीत १६ जण दोषी ठरविण्यात आलं आहे. अंबाजोगाईतील दिवाणी न्यायालयात हा खटला सुरु आहे. त्यावर आज निर्णय देण्यात आला.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २००९ मध्ये तब्बल २ कोटी ७५ लाखाचे कर्ज दिले होते. हे कर्ज बेकायदा दिल्याचा ठपका ठेवत लेखा परिक्षणातील अहवालानूसार जिल्हा बँकेच्या तत्कालीन अध्यक्षासह आठ संचालक आणि बँकेच्या बड्या अधिकार्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
यामध्ये तत्कालीन अध्यक्ष राजाभाऊ मुंडे, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण नरहरी कुलकर्णी, रामराव आघाव, रामकृष्ण मानाजी कांदे, विठ्ठल गोविंद जाधव, दशरथ वनवे, शरद रमाकांत घायाळ, नागेश किशनराव हन्नुरकर, विनायक सिताराम सानप, शिवाजी रामभाऊ खाडे, मंगला उर्फ प्रेरणा सुंदरराव मोरे, लताबाई सानप, विजयकुमार दत्तात्रय गंडले, जनार्दन प्रभाकर डोळे, रंगनाथ बाबुराव देसाई आणि सुनिल बाबासाहेब मसवले यांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या:
बीड बँक : एकाही आरोपीला ताब्यात न घेता आरोपपत्र तयार!