बीड: मंगळवारी बीडमध्ये झालेल्या विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमाचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला. शिवसेनेने मंजूर करून आणलेल्या विकास कामांना राष्ट्रवादी विरोध करते आहे म्हणून शिवसैनिकांनी हा पवित्रा घेतला आहे. मात्र आम्ही या कार्यक्रमाला शिवसेनेचे यांना बोलावलं होतं अशी धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


बीड जिल्ह्यात झालेल्या आणि यापुढे होत असलेल्या 100 कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. 


बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला शिवसैनिकांनी तीव्र विरोध केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष मंजूर केलेल्या कामामध्ये राष्ट्रवादीचे आमदार अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. त्यामुळे सकाळी कार्यक्रम सुरु होण्याआधी बीडच्या शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवून या कार्यक्रमाचा निषेध केला होता आणि त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेत गटबाजी झाल्याचं पाहायला मिळालं. 


या प्रकरणानंतर आता धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बीडमध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष आमने-सामने होते आणि आज ज्या कामाचं भूमीपूजन आणि लोकार्पण झालं त्या सर्व कामासाठीचा निधी राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मंजूर करून आणला आहे. या कार्यक्रमासाठी आम्ही शिवसैनिकांना देखील निमंत्रण दिलं होतं. मात्र त्यांनी या कार्यक्रमाचा निषेध केला असला तरी आम्ही या प्रकरणाला जास्त महत्त्व देत नाहीत अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: