बीड: नोंदणी कार्यालयात कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणात दाखल गुन्ह्यात बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर आणि त्यांचे पुत्र डॉ. योगेश क्षीरसागर यांना बीडच्या सत्र न्यायालयाने अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला आहे. क्षीरसागर पितापुत्रांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरु असून पुढील तारखेपर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच रविंद्र क्षीरसागरांच्या अटकपूर्व जामिनावर 5 मार्चला सुनावणी होणार आहे. पाचवे जिल्हा सत्र न्यायाधिश एस. टी. डोके यांच्या न्यायालयाने हा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.


गेल्या आठवड्यात जमिनीच्या व्यवहारातून बीड शहरातील तहसील कार्यालयासमोर गोळीबार झाला होता. यात दोघे जखमी झाले आहेत. यातील जखमी सतीश क्षीरसागरच्या फिर्यादीवरुन दाखल गुन्ह्यात बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण आणि त्यांचे पुत्र योगेश क्षीरसागर यांना आरोपी करण्यात आले आहे. या पितापुत्रांनी अटकपूर्व जामिनासाठी बीडच्या सत्र न्यायालयात धाव घेतली होती. या अर्जाची सुनावणी होईपर्यंत अंतरिम जामिनाची विनंती केली होती. त्याची सुनावणी आज सकाळी न्या. एस. टी. डोके यांच्यासमोर झाली. यावेळी न्यायालयाने भारतभुषण आणि योगेश क्षीरसागर यांना अंतरिम जामीन देत अटकेपासून संरक्षण दिले आहे. 


रविंद्र क्षीरसागरांच्या जामिनावर 5 मार्चला सुनावणी
रविंद्र क्षीरसागरांच्या अटकपूर्व जामिनावर 5 मार्चला होणार सुनावणी होणार आहे. बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे रवींद्र क्षीरसागर हे वडील आहेत. आ. संदीप क्षीरसागर यांचे वडील रविंद्र क्षीरसागर, भाऊ हेमंत आणि अर्जून यांच्यासह आठ जणांवर प्राणघातक हल्ला आणि दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. 


संबंधित बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha