बीड : पंढरपूरहून देवदर्शन करुन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. बीडमध्ये ट्रक आणि क्रुजरच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.
धुळे-सोलापूर महामार्गावर मांजरसूंबाजवळच्या वाणगाव फाट्यावर हा अपघात झाला. बुलडाण्याचे भाविक क्रुझरमधून देवदर्शन करुन पंढरपूरहून परत येत होते. त्याचवेळी वाणगाव फाट्याजवळ क्रुझर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला.
यात क्रुझरमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.