पुणे : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana) सुरू केली आहे.शासनाच्या या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील लाखो महिलांना मिळत आहे. मात्र या योजनेतही अनेक गैरप्रकार होताना दिसून येत आहेत. यामध्ये अनेक जण फसवणूक करत आहेत. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची (ladki bahin yojana) नोंदणी अजूनही सुरूच आहे. या योजनेचा (ladki bahin yojana) लाभ मिळवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरताना आधार कार्डचा नंबर वापरून गैरप्रकार झाल्याचे उघडकीस येत आहे. याप्रकरणी राज्यभरातून हजारो तक्रारी दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी 30 गुन्हे दाखल करण्यात आल्याची आणि या प्रकरणात, संबंधितांना ताब्यात घेण्यात आले आहे.


'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' (ladki bahin yojana) योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना दरमहिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात. या योजनेसाठी राज्यात्या कानाकोपऱ्यातून ऑनलाइन-ऑफलाइन अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली. या योजनेंतर्गत अर्ज भरण्यासाठी राज्य सरकारने या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. एकाच महिलेच्या नावाने 28 अर्ज भरण्यात आले आहेत. यापैकी केवळ एक अर्ज मंजूर झाला आहे. उर्वरित 27 अर्ज रद्द करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यात दाम्पत्याने बनावट कागदपत्रे दाखवून अनेक अर्ज भरल्याचा प्रकार उघडकीस आला. दोघांनाही अटक करण्यात आली आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


योजनेची अर्ज नोंदणी सुरू असली, तरी कागदपत्रांची सखोल तपासणी करून अर्ज मंजूर करण्यात यावेत असे आदेश जिल्हास्तरावर देण्यात आला आहे. गैरप्रकार करून या योजनेचा लाभ घेतला असल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करून केला जाईल त्याचबरोबर मिळालेल्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येत आहे. 


छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच व्यक्तीने पत्नीच्या नावाने 30 अर्ज भरून योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे विविध बँक खात्यांचे नंबर देऊन वेगळ्याच व्यक्तीचा आधारकार्डाचा नंबर आणि फोटो बदलून कागदपत्रे जोडल्याचे आढळून आले आहे. पुणे, मुंबई, पनवेल, नागपूर या ठिकाणी देखील अशाच घटना समोर आल्या आहेत. राज्यभरातून प्राप्त झालेल्या तक्रारी, तसेच संशयास्पद कागदपत्रांच्या आधारावर 30 ठिकाणी गुन्हे दाखल केले असल्याची माहिती महिला व बालविकास खात्याचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.


फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई


या योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. बनावट कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांची सरकार ओळख करून देत आहे.  बनावट दस्तऐवज अर्ज करून कोणी लाभ घेतला असेल तर. त्यामुळे सरकार अशा लोकांकडून वसुलीही करू शकते आणि अशा लोकांना तुरुंगातही पाठवू शकते.