मुंबई : दुपारच्या वेळी तुम्हाला उन्हात बाहेर पडायचं असेल तर काळजी घ्या.. कारण, मुंबईसह कोकणामध्ये सध्या उष्णतेची लाट आहे. रायगड जिल्ह्यातल्या भिरामध्ये काल तब्बल 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मुंबईतही तब्बल 37.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.


मुंबई, पुणे, नाशिकमध्येही उन्हाने लोक हैराण झाले आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पारा 42 अंशावर पोहोचल्याने येणाऱ्या काळात उन्हाचा तडाखा चांगलाच बसण्याची भीती आहे. आतापर्यंत या महिन्यात नोंदवलेलं हे सर्वाधिक तापमान आहे.

उष्माघातापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल?

  • दुपारी 1 ते 3 उन्हात फिरु नका

  • मासे, मटण, तेलटक पदार्थ, शिळे अन्न खाणं टाळा

  • मद्यसेवन, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक घेणं टाळा

  • उन्हातून आल्यानंतर लगेच फ्रीजमधलं पाणी पिऊ नका

  • तहान नसेल तरीही पुरेसं पाणी प्या

  • सौम्य रंगाचे, सैल आणि खादीचे कपडे वापरा

  • बाहेर जाताना गॉगल, छत्री आणि टोपीचा वापर करा

  • प्रवासात पाणी नेहमी सोबत ठेवा

  • अशक्त वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या

  • ओआरएस, लस्सी, लिंबू पाणी आणि ताक अशी पेय घ्या

  • घर थंड राहिल याची काळजी घ्या

  • रात्री घराच्या खिडक्या नेहमी उघड्या ठेवा

  • जनावरांचीही काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी जनावरांना सावलीत ठेवा, पुरेसं पाणी द्या