भाजप नेत्यांशी झालेल्या भेटीगाठींनंतर राणेंबाबत निर्णय होईल, असं म्हटलं जात आहे. पुढच्या महिन्यात राज्यसभा निवडणुका आहेत. त्या दृष्टीनं राणेंना महाराष्ट्रापेक्षा दिल्लीत पाठवण्याचा विचार भाजपकडून केला जाऊ शकतो, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजपच्या मुख्यमंत्र्यांची परिषद दिल्लीत सुरु असल्याने मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत गेले आहेत. मात्र दिल्लीत राणेंनीही उपस्थिती लावल्यामुळे विविध चर्चा रंगल्या आहेत.
नारायण राणेंचं भाजपमध्ये पुनर्वसन होणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही महिन्यांपूर्वी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना म्हणाले होते. राणेंचा आऊटस्पोकन स्वभाव अडसर ठरण्यापेक्षा त्यांचा अनुभव आमच्यासाठी महत्वाचा आहे. अशा व्यक्ती पक्षाची संपत्ती असतात, असंही फडणवीसांनी सांगितलं होतं.
नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला असलेल्या विरोधावर शिवसेना ठाम आहे.