प्रार्थनाचं मुंबईहून रविवारी रात्री बार्शीत उशिरा आगमन झालं आहे. त्यानंतर सोमवारी तिच्या सुभाषनगरमधल्या राहत्या निवासस्थानातून प्रार्थनाची शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात येणार आहे. शहरातील विविध संस्था आणि क्रीडाप्रेमी नागरिकांनी प्रार्थनाच्या ऑलिम्पिक निवडीनिमित्त शुभेच्छांचे फलकही शहरात लावले आहेत.
फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या आयटीएफ महिलांच्या खुल्या स्पर्धेत तिने 25 हजार डॉलर्सचे विजेतेपदही पटकावलं आहे. दुहेरीतील वर्ल्ड रँकिंगमध्येही ती 186 व्या स्थानावर आहे. प्रार्थना सध्या हैदराबाद येथील सानिया मिर्झा टेनिस अकादमीत प्रशिक्षक आणि सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली ती टेनिसचा कसून सराव करत आहे.
बार्शीच्या प्रार्थनाला सानियाची पसंती, रिओमध्ये वर्णी
सानिया मिर्झानं रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला दुहेरीत प्रार्थनासोबत खेळण्याची इच्छा असल्याचं अखिल भारतीय टेनिस संघटना अर्थात आयटालाला कळवलं होतं. 21 वर्षीय प्रार्थनानं आजवर आयटीएफ स्पर्धांमध्ये एकेरीत पाच तर दुहेरीत दहा विजेतेपदं मिळवली आहेत. 2014 साली इन्चिऑन इथं झालेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत प्रार्थनानं सानियाच्या साथीनं कांस्यपदक मिळवलं होतं.