अहमदनगर : कोण कसला विश्वविक्रम करेल, याचा पत्ता नाही. अहमदनगर जिल्ह्यातील दोन केशकर्तनकारांनी चक्क कमी वेळात सर्वाधिक जणांना केस कापून विश्वविक्रमाची नोंद केलीय. मनोज शिंदे आणि पूनम शिंदे असे विक्रम करणाऱ्या दोन केशकर्तनकारांची नावं आहेत. मनोज शिंदे आणि पूनम शिंदे 'बियॉन्ड ब्युटी सलून'चे संचालक आहेत.
अहमदनगरमधील बाणेश्वर विद्यालयात सकाळी मनोज आणि पूनम यांनी केस कापण्याला सुरुवात केली आणि पुढील आठ तासात (480 मिनिटं) तब्बल 972 जणांचे केस कापले. या 972 जणांमध्ये स्त्री आणि पुरुषांचाही समावेश होते.
मनोज आणि पूनम यांच्या या विक्रमाची नोंद 'ग्लोबल रेकॉर्ड रिसर्च फाऊंडेशन इंडिया'च्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. यापूर्वी जळगाव येथे जय विजय निकम आणि प्रीती निकम यांनी 10 तासात 691 जणांचे केस कापून विक्रमाची नोंद केली होती. मात्र, आज मनोज आणि पूनम शिंदे यांनी हा विक्रम मोडून, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केलीय.
विश्वविक्रम ! 480 मिनिटात 972 जणांचे केस कापले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Oct 2018 02:59 PM (IST)
अहमदनगरमधील बाणेश्वर विद्यालयात सकाळी मनोज आणि पूनम यांनी केस कापण्याला सुरुवात केली आणि पुढील आठ तासात (480 मिनिटं) तब्बल 972 जणांचे केस कापले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -