बारामती : राष्ट्रवादीत (NCP) फूट पडली पण पवार कुटुंब (Pawar Family) एकत्र आहे की नाही या प्रश्नाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. त्यातच आता अजित पवार (Ajit Pawar) यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार (Shriniwas Pawar) यांच्या घरी पवार कुटुंब एकत्र जमले. शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे यांसह पवार कुटुंबातील अनेकजण यावेळी उपस्थित होते.  अगदी सुनेत्रा पवारांनी (Sunetra Pawar) देखील हजेरी लावली, पण अजित पवार आणि त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र पार्थ आणि जय मात्र अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पुन्हा एकदा पवार कुटुंबियांच्या चर्चा या राजकीय वर्तुळात सुरु झाल्यात. 


राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही वेळापूर्वी सोशल मीडियावर कुटुंबाचे काही एकत्र फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अजित पवार तसेच पार्थ पवार आणि जय पवार देखील उपस्थित नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. दरम्यान पक्षात जरी फूट पडली असली तरीही पवार कुटुंब हे कायम एकत्रच असल्याचं पवार कुटुंबाकडून सांगण्यात येतं. पण आता भाऊबीजेला तरी अजित पवार हे उपस्थित राहणार का याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. 



शरद पवार - अजित पवार भेट 


काही दिवसांपूर्वी प्रतापराव पवार यांच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. त्यातच पुन्हा एकदा दिवळीत पवार कुटुंबाच्या घरी संपूर्ण कुटुंब एकत्र जमते. यावेळी देखील अजित पवार उपस्थित राहणार का याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.


भाऊबीजेला दादा हजर राहणार? 


राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर पवार कुटुंबामध्येही फूट पडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यातच रक्षाबंधानाला अजित पवार हजर न राहिल्यामुळे या चर्चा अधिकच जोर धरुन लागल्या. त्यामुळे आता भाऊबीजेला दादा हजर राहणार का याची वाट सर्वजण पाहत आहेत. पण त्याआधी दिवाळी ही पवार कुटुंबात जोरात साजरी केली जाते. त्यातच अजित पवार यांच्या धाकट्या भावाच्याच घरी हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. त्यालाही अजित पवार आणि त्यांच्यासह त्यांची मुलं पार्थ आणि जय पवारही हजर नसल्याचं पाहायला मिळालं. 


प्रतापराव पवारांच्या घरी भेट झाल्यानंतर शरद पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. दिवाळीच्या निमित्ताने पुण्यात पवार कुटुंबाचा मेळा जमला होता. त्यावेळी माणसाच्या आयुष्यात चढ उतार असतात, अडचणी असतात वेळप्रसंगी अडचणींना तोंड द्यावे लागते पण काही दिवस संकटांचे विस्मरण करून कुटुंबासमवेत दिवस घालवावे लागतात, असं म्हणत शरद पवारांनी चर्चांना उत्तर दिलं होतं. 



हेही वाचा : 


Supriya Sule : 'त्या' गटाचे वकील शरद पवारांना भेटले की सॉरी म्हणतात, सुप्रिया सुळेंची बारामतीत टोलेबाजी