बारामती : पुणेरी पाट्यांसाठी पुणे शहर प्रसिद्ध आहे पुणेरी पाट्या वाचनीय तशाच त्या खोचकपणे लिहलेल्या असतात, त्यामुळे ते पुण्यासह महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. पुणेरी पाट्यांप्रमाणे आता बारामतीतही एक बॅनर सोशल मीडिया वरती धुमाकूळ घालत आहे. शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या गोविंदबागेसमोर अजित पवार यांच्या अभिनंदनाचा एक बॅनर लावण्यात आला आहे, त्यावरती आगळावेगळा मजकूर लिहिल्याने तो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
या बॅनरवर 'आमच्या इथे डिपॉझिट जप्त करून मिळेल' असा मेसेज छापण्यात आल्यानं या बॅनरचे फोटो सध्या बारामतीसह इतरत्र मोठ्या प्रमाणावर ती व्हायरल होत आहेत. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडून आले.
अजित पवार यांनी महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा तब्बल 1 लाख 66 हजारांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे बारामती सध्या अजित पवार यांचे ठिकाणी लागलेले आहेत. पण एका बॅनरवर "आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल" अशा आशयाच्या मजकूर छापल्याने बारामतीत लावण्यात आला सध्या ह्या बॅनर चर्चेचा विषय असून मोठ्या प्रमाणावर तो व्हायरल होत आहे.
'आमच्या इथे डिपॉझिट जप्त करून मिळेल', बारामतीतल्या बॅनरबाजीची चर्चा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Oct 2019 10:34 PM (IST)
अजित पवार यांनी महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा तब्बल 1 लाख 66 हजारांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे बारामती सध्या अजित पवार यांचे ठिकाणी लागलेले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -