सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात आज (31 जुलै) बँक ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीचा स्लॅब कोसळला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या उर्वरित 22 जणांना बाहेर काढलं असून शोधकार्य सुरु आहे. प्रशांत बागल असं मृताचं नाव असून ते प्रतापसिंह मोहिते पाटील कॉलेजचे कर्मचारी आहेत.
करमाळ्यातील महेंद्रनगरात राजेश जोशी नावाच्या इसमाची मजली इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्यावर बँक ऑफ महाराष्ट्रची करमाळा शाखा आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास बँकेचा स्लॅब कोसळला. ज्यात बँक कर्मचाऱ्यांसह इतर लोकही ढिगाऱ्याखाली अडकले.
या दुर्घटनेत एका ग्राहकाचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. सात जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असून पाच किरकोळ जखमींना डिस्चार्ज दिला आहे. तर दहा जखमींना पुढील उपचारांसाठी सोलापूला हलवण्यात आलं आहे.
दरम्यान ढिगाऱ्याखालून सर्वांना बाहेर काढलं असलं तरी शोधकार्य अद्यापही सुरु आहे. अग्निशमन दलाचे जवान स्थानिकांच्या मदतीने हे काम करत आहेत.
करमाळ्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Jul 2019 01:14 PM (IST)
करमाळ्यातील महेंद्रनगरात राजेश जोशी नावाच्या इसमाची मजली इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्यावर बँक ऑफ महाराष्ट्रची करमाळा शाखा आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास बँकेचा स्लॅब कोसळला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -