स्मार्ट बुलेटिन | 31 जुलै 2019 | बुधवार | ABP Majha



    1. इंडियन मेडिकल असोसिएशनचा आज देशभरात बंद, लोकसभेत संमत झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध, 45 हजार डॉक्टरांचं कामबंद आंदोलन

    2. 'कॅफे कॉफी डे' चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला, 36 तासानंतर मंगळूरु येथील नेत्रावती नदीच्या पात्रात मृतदेह

    3. अखेर तिहेरी तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर, मोदी सरकारचं ऐतिहासिक यश, तिहेरी तलाक देणाऱ्याला मुस्लिम पतीला तीन वर्षांची शिक्षा

    4. काँग्रेस-राष्ट्रवादीतल्या आयारामांचं आज भाजपत जंगी स्वागत, संध्याकाळी चार वाजता सोहळा, शिवेंद्रराजे, पिचड, संदीप नाईकांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादीला मोठं भगदाड

    5. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या बंगल्यावर, नव्या राजकीय चर्चांना उधाण






  1. पश्चिम महाराष्ट्र, कोकणातलं पाणी मराठवाड्याच्या दिशेनं वळण्यासाठीच्या सर्व्हेला कॅबिनेटची मंजुरी, दीड महिन्यात सर्वे पूर्ण करण्याचं टार्गेट

  2. साताऱ्याच्या काशीळजवळ भीषण अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, सर्वजण धारवाडचे रहिवासी

  3. कृष्णा नदीची पातळी 35 फुटांवर पोहोचली, सांगलीला पुराता धोका, तर विदर्भातील अनेक नद्यांच्या पातळीत वाढ

  4. करोडो रुपये खर्चून बांधलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाच्या सिलिंगचा भाग कोसळला, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

  5. मुंबई महानगरपालिकेतील दांडीबहाद्दर नगरसेवकांना चाप बसणार, बायोमेट्रिक हजेरी सक्ती करण्याचा गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय