नाशिक : बाजारात दहा रुपयांचा कॉईन घेण्याबाबत ग्राहकांमध्ये जो गोंधळ आहे, त्यामध्ये आता बँकांचीही भर पडली आहे. कारण ग्राहक आमच्याकडून दहा रुपयांचे कॉईन घेत नाहीत, म्हणून आम्हीही ते घेणार नाही, असं अजब स्पष्टीकरण नाशिकमधील एका बँकेने दिलं आहे.
दहा रुपयांचे कॉईन घेण्यासाठी नकार दिल्याने दोन शेतकऱ्यांनी नाशिकमधील बँक ऑफ इंडियासमोर आंदोलन सुरु केलं आहे. 10 हजार रुपयांचे 7 हजार कॉईन या शेतकऱ्यांनी बँकेसमोर टाकले आहेत.
शिवाजी वाघ आणि नामदेव वाघ असं या शेतकऱ्यांचं नाव आहे. रोज 100 रुपयेच घेऊ, म्हणजे 7 हजार रुपये भरण्यासाठी 70 वेळा बँकेत या, असं बँकेचं म्हणणं आहे. प्रशासनाच्या आदेशानंतरही दहा रुपयांचे कॉईन घेण्यासाठी बँकांकडून टाळाटाळ केली जात असल्याचं यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आलं आहे.