कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर परिसरात प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. देवस्थान समिती आणि परिसरातील विक्रेत्यांनी हा निर्णय घेतला आहे.

कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर परिसरात पूर्वी चप्पलबंदी आणि मोठ्या बॅग नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. या बंदीला भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर आता परिसरात कचरा होऊ नये म्हणून पर्यावरणपुरक पिशव्यांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

महालक्ष्मीच्या दर्शनाला येताना पुजेचे साहित्य आणण्यासाठी सध्या प्लॅस्टिकच्या कमी मायक्रॉन असलेल्या पिशव्या वापरल्या जात होत्या, मात्र या परिसरात सर्व प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली आहे.