पैसे नसल्याने बालचित्रवाणी बंद, सर्व कर्मचारी आजच कार्यमुक्त

Continues below advertisement
मुंबई: पुण्यातील बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा जीआर काढला आहे. दैनंदिन खर्च भागवण्यासाठी रक्कम नसल्यामुळे आणि 50 पेक्षा कमी कर्मचारी असल्यामुळे ही संस्था बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. इतकंच नाही तर आजच सर्व कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आलं आहे. बालचित्रवाणीऐवजी आता ई- बालभारती ही नवी संस्था स्थापन करण्यात येणार आहेत. जे दुकान चालत नाही, ते चालू ठेऊन काय उपयोग? बालचित्रवाणीचे कार्यक्रम दूरदर्शनवर चालत नाहीत. जे दुकान चालत नाही, ते चालू ठेऊन काय उपयोग? एखाद्या संस्थेवर इमोशनल होऊन आपण त्याचं नुकसान करण्यापेक्षा, काळानुरुप ती कशी बदलेल, टिकवता येईल आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज भागवता येईल ह्यावर माझा जोर आहे, असं सांगत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बालचित्रवाणी कायमची बंद होणार असल्याचे संकेत दिले होते.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola