Uddhav Thackeray Speech : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त (Balasaheb Thackeray's Birth Anniversary) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे शिवसैनिकांना सांगताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीकेचा बाण सोडला. भाजपवर उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. मी बाहेर पडणार. महाराष्ट्र पिंजून काढणार. जे विरोधक माझ्या तब्बेतीची काळजी घेत आहे, त्या काळजीवाहू विरोधकांनी भगव्याचं तेज दाखवणार. विरोधकांची चिंता करण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला. भाजपवर टीकेचा बाण ते पुढील आपलं धोरणं काय असेल, यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनात वक्तव्य केलं. पाहा उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे...  



  • शिवसंपर्क मोहिम ठरवली पण दुसरी लाट आली. 

  • राज्यभर फिरणार होतो पण मानेचं दुखणं उपटलं.

  • लाटा मागून लाट येत आहेत, राज्यात शिवसेनेची लाट आणायची,आपल्याकडे भगव्याचा वारसा

  •  दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न पूर्ण करणारच, बाळासाहेबांचा मुंबईत पुतळा उभारणार

  • लवकरात लवकर बाहेर पडणार, महाराष्ट्र पिंजून काढणार

  • माझ्या तब्बेतीची काळजी घेतायत...त्यांना मी दाखवून देणार

  • काळजीवाहू विरोधकांना दाखवून  देवू , त्यांना आपण पोसलं , २५ वर्षात युतीत सडली यावर मी कायम  

  • राजकारणं हे गचकरण आहे. तसेहे गचकरणी आहे...राजकारण म्हणून हे काही खाजवत आहेत.

  • हिंदुत्वाचे कातडं यांनी पांघरलं आहे. हिंदुत्वापासून दुर जाणार नाही.

  • एकट्यानं लढण्याची आमची तयारी....मर्द आहोत शंड नाहीत....तुम्ही तुमचे अधिकार वापरू नका

  • आव्हान द्यायचं आणि ईडी आणि इतर चौकश्यांचा फेऱ्या लावायचा हे शौर्य नाही

  • आव्हान देण्याची गरज नाही. आता पुढे जात आहोत.

  • सोयीप्रमाणे हिंदूत्व हे आमचं हिंदूत्व नाही

  • वापरा आणि फेकून द्या ही भाजपची निती

  • आम्हाला गुलामासोबत वागवण्याचं तुमचं स्वप्न आम्ही तोडली

  • मर्दासारखी शपश घेतली चोरा सारखी घेतली नाही. शिवाजी महाराजांसमोर घेतली

  • नगरपंचायतीच्या निवडणूका झाल्या, इतर राज्यातही निवडणूक लढवत आहोत. आता होईल ते होईल

  • हार जीत होईल जे होईल ते होईल आम्ही लढणार, आम्ही जिद्दीनं लढू एक दिवस आमचा ही येईल

  •  सर्व जागा सेनेनं लढवल्या नव्हत्या, आम्ही नंबर चार वर आहोत पण आम्ही किती जागा लढवल्या 

  • आत्ता पर्यंत जेवढ्या आल्या नव्हत्या त्या पेक्षा जास्त जागा आत्ता जिंकल्या आहेत. 

  • काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते छोट्या निवडणूका गांभिर्याने घेतल्या 

  •  मी पण फिरलो नाही. मूठभूर शिवसैनिकांना घेवून जिंकून दाखवू 

  •  आपल्या प्रतिस्पर्ध्यांनी संस्थात्मक कामं केली आहेत. 

  • पण आपला मुख्यमंत्री आहेत. तरीही आपल्या किती संस्था आहेत. 

  •  वाघ वाघासारखा जगला पाहीजे....१०० दिवस शेळी सारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगा 

  • बंगालच्या वाघीणीकडे बघा सर्व मागे लागले होते. पण तीने एकच फटका मारला 

  • बाबरीनंतर शिवसेनेचं सिमोल्लंघन केलं असतं पंतप्रधान शिवसेनेचा असता 

  • तुम्ही देश सांभाळा आम्ही राज्य सांभाळू हे साहेबांचं मत होतं.

  • पण शिवसेनेची फसगत केली. सेनेला संपवण्याचा प्रयत्न झाला

  • आम्ही ही त्यांना झटका दिला , शिवसेनेला नामशेष करायला गेली पण झालं काय

  • हिंदूत्वासाठी युती केली...सत्तेसाठी युती केली नाही

  • आणीबाणी सारखी स्थिती निर्माण झाली आहे. ती शिवसेना मोडू शकते.

  • यानंतर प्रत्येक निवडणूक ही जिंकायचीच या जिद्दीनं लढायची आहे. मग ती कोणतीही निवडणूक असो

  • फाजील आत्मविश्वास बाळगू नका....

  • शिवसेनाप्रमुख आपल्यात आहेत. त्यांची प्रेरणा आपल्यात आहे.

  • हातात बळ नसेल तर एक हाती स्वबळावर सत्ता कशी येणार

  •  भगव्याचं मोल कमी होवू देवू नका.....