Bajrang Sonawane : लोकसभेला तुम्ही चांगले मतदान केले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मी मरेपर्यंत तुमच्या सोबत आहे. घार फिरे आकाशी चित्त त्याचे पिलापाशी या म्हणीप्रमाणे माझे पूर्ण लक्ष मी तुमच्याकडे आहे, मी कुठेही असो असे मत खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केले. कमळ आणि घडी दोन्ही एकच आहेत तुम्ही कुणालाही मतदान करा. लोकसभेत वक्फ बोर्डाच्या बाजूने आम्ही मतदान केले आहे. 40 वर्षापासून हे परळीवर राज्य करत आहेत, यांनी परळीचा काय विकास केला का? असा सवाल करत सोनवणेंनी पंकजा मुडेंवर टीका केली. सिमेंट फॅक्टरीमुळे या परिसरातल्या लोकांना त्रास होतो, मात्र तुम्हाला कमिशन मिळते म्हणून तुम्ही गप्प आहात असे सोनवणे म्हणाले. परळी वैजीनाथ नगरपरिषदेच्या निमित्ताने आयोजीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सोनवणे बोलत होते.
माझे दोन्ही नगरसेवक निवडून द्या मी सिमेंट फॅक्टरी हटवून दाखवणार
माझे दोन्ही नगरसेवक निवडून द्या मी सिमेंट फॅक्टरी हटवून दाखवणार. रेल्वेला थांबवणारा मी आहे कुणाचेही घर जाऊ देणार नाही. तुम्ही मला निवडून दिले आहे. तुम्ही परळीसाठी काय केलं माध्यमांनी त्यांना जाऊन विचारावं. बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त प्रदूषण कुठे असेल तर मी खात्रीशीर सांगतो की परळीत सगळ्यात जास्त प्रदूषण आहे. ज्या लोकांनी तुमच्यासाठी मार खाल्ला जेलमध्ये गेले मात्र तुम्ही भावासोबत गेलात या लोकांनी काय करायचं? असा सवाल सोनवणे यांनी पंकजा मुंडेंना केला. मी लोकसभेला मतदान मागितलं नाही तरी तुम्ही मला मतदान दिलं. परळीत विकास करण्यासाठी केंद्राचा निधी मी देणार असल्याचे सोनवणे म्हणाले. मी ट्विट करून ज्योतिर्लिंग विकासासाठी पैसे मागायला गेलो हे सांगणार नाही असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली.
भ्रष्टाचार करायचा आणि दुसरे पैसे मागायचे हे माझ्याकडे चालणार नाही
विकास करण्यासाठी मी शहाणा भेटलो हे सांगणार नाही. भ्रष्टाचार करायचा आणि दुसरे पैसे मागायचे हे माझ्याकडे चालणार नाही. मी फकीर आहे मला कशाची फिकीर नाही. तुम्ही दुसरीकडे मतदान केले म्हणजे मोदीला मतदान केलं.
नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. काही नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका या 2 डिसेंबरला पार पडल्या तर काही नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका उद्या म्हणजे 20 डिसेबरला पार पडणार आहेत. त्यानंतर 21 डिसेंबरला सर्वच नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे.