Hemant Patil on BJP : भाजपकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी केला आहे. नांदेडमध्ये 50 टक्के जागांची शिवसेनेची मागणी आहे. अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचा इशारा देखील हेमंत पाटील यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून युतीचा प्रस्ताव आला आहे. सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास राष्ट्रवादीसोबत युतीची तयारी असल्याचेही हेमंत पाटील म्हणाले. 

Continues below advertisement

हेमंत पाटलांनी घेतली  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट 

नांदेडमध्ये भाजपकडून शिवसेनेच्या निवडणूक समितीच्या सदस्यांना सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याचा आरोप शिवसेना नेते आमदार हेमंत पाटील यांनी केला आहे. शिवसेनेची 50 टक्के जागांची मागणी असताना भाजपकडून केवळ 6 जागा देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, तुमच्या किती जागा निवडून येणार आहेत? असे प्रश्न विचारुन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा अपमान केला जात असल्याचा आरोपही आमदार पाटील यांनी केला आहे. दरम्यान काल आमदार हेमंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट घेऊन युतीबाबत प्राथमिक चर्चा केली आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून युतीचा प्रस्तावही आल्याची माहितीही त्यांनी दिली. भाजपकडून सन्मानपूर्वक जागा वाटप झाले तर युतीसाठी तयार आहोत. अन्यथा, शिवसेना स्वबळावर किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून निवडणूक लढवेल, अशी भूमिका आमदार हेमंत पाटील यांनी स्पष्ट केली आहे.

15 जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी होणार मतदान

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अखेर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपताच आज (15 डिसेंबर) दुसऱ्याच दिवशी निवडणूक आयोगाने मनपा निवडणुकीची घोषणा केली. अवघ्या एक महिनाभरामध्ये  निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. येत्या 16 जानेवारीपासून बेवारस पडलेल्या महानगरपालिकांना नवे कारभारी मिळणार आहेत. राज्यांमध्ये मुदत संपलेल्या 27 महानगरपालिका आणि नव्याने निर्माण झालेल्या जालना आणि इचलकरंजी या महापालिकेसाठी एकाचवेळी मतदान होईल. दरम्यान, या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेत्यांनी हालचाली सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे.

Continues below advertisement

असा आहे निवडणूक कार्यक्रम?

23 ते 30 डिसेंबर नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत  नामनिर्देशन छानणी 31 डिसेंबर रोजी होणारउमेदवारी अर्ज माघारी मुदत 2 जानेवारी 2026 चिन्ह वाटप, अंतिम उमेदवार यादी 3 जानेवारी मतदान 15 जानेवारी 2026 मतमोजणी 16 जानेवारी 2026 

महत्वाच्या बातम्या:

शून्य आणि शून्य मिळून शून्य होतात, ठाकरे बंधुंच्या युतीवरुन आशिष शेलारांचा टोला, म्हणाले, कार्यकर्ते एकमेकांचं डोकं फोडतील