कोल्हापूर : अॅट्रॉसिटी कायदा कडक करा, यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापुरात बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात एससी, एसटी, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी, मराठा, बारा बलुतेदार, ख्रिश्चन, मुस्लिम, लिंगायत समाजाच्या मागण्या मांडण्यात आल्या.


ऐतिहासिक दसरा चौकातून सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात झाली आणि मुख्य रस्त्यांवरुन जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा धडकला.  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता झाली.

छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले यांची वेशभूषा परिधान करुन कार्यकर्त्यांनी मोर्चाचं नेतृत्त्व केलं.

या मोर्चात निळे, पिवळे आणि हिरवे झेंडे घेऊन तरुणाई मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती. 288 बहुजन संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला.