अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कर्जमाफीवर एक गंभीर आरोप केला आहे. कर्जमाफीसाठी बँकेद्वारे सुरू असलेल्या हिशोबमध्ये जाणून-बुजून गडबड केली असल्याची अनेक शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांनी याची दखल घेत राज्य सरकारकडे अहवाल सादर केलाय. काही जिल्हा बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी तीन ते चार पट व्याज लावल्याचं बच्चू कडू यांच्या निदर्शनास आलंय.

Continues below advertisement


राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केलं, की सरकार दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करणार आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं त्या शेतकऱ्यांना अनेक बँकांनी दुप्पट-तिप्पट व्याज आकारणी केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक आणि काही राष्ट्रीयीकृत बँकेने तीन ते चार पट व्याज लावल्याचे बच्चू कडू यांच्या निदर्शनास आले आहे. यावेळी मुद्दल व व्याज असे मिळून बँकेत 30 सप्टेंबर 2019 पर्यंत हप्ते न भरणारे आणि दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्यांना कर्जमाफी मिळणार आहे. पण या हिशोबामध्ये मोठी गडबड झाली असल्याचा गंभीर आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे.


'आघाडी सरकारनं कर्जमाफीत घोळ केला असेल तर कारवाई करा'


कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी 15 एप्रिलपर्यंत करा : मुख्यमंत्री
कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी 15 एप्रिलपर्यंत करा, असे निर्देश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दररोज या योजनेचा आढावा घेणार आहेत. देशातली सर्वात मोठी आणि अल्पावधीत राबवली जाणारी योजना यशस्वी करुन दाखवा, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केलंय. दुसरीकडे अजित पवारांनीही अधिकाऱ्यांना आपल्या स्टाईलनं सूचना केल्यात. शेतकऱ्यांशी चांगले वागा, त्यांची सरकारबद्दल नाराजी राहणार नाही याची काळजी घ्या असं अजित पवार म्हणाले आहेत.


21 फेब्रुवारीपासून गावनिहाय याद्या प्रसिद्ध होणार
हे सरकार सत्तेवर आल्यावर महिन्याभराच्या आत कर्जमुक्ती योजनेचे धाडसी पाऊल उचलले आहे. 21 फेब्रुवारीपासून गावनिहाय याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यावेळी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होईल. अशा वेळी प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना चांगली वागणूक द्यावी. त्याच्याशी सौजन्याने वागा. त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. त्याची तक्रार स्थानिक पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.


CM Thackeray Meet | मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर पहिल्यांदाच बैठक, कर्जमाफी योजनेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा