अमरावती : आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya) आहेत. राष्ट्रीय किसान क्रांती दलाकडून लखनौमध्ये बच्चू कडू यांचं स्वागत करण्यात आले आहे. दुपारी अयोध्येतील लता मंगेशकर चौकात जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर रामलल्लाचं दर्शन घेणार आहे. राज्यात जातीय आरक्षणाचा मुद्दा पेटला असतांना शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण मिळावं यासाठी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार समोर नवा पेच निर्माण झाला आहे.
आजपासून दोन दिवस आमदार बच्चू कडू अयोध्या दौऱ्यावर आहेत तर आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक झाले. आज बच्चू कडू प्रभू रामाचे दर्शन घेणार असून याठिकाणी बच्चू कडू प्रभू रामचंद्रला कापूस, तूर, सोयाबीन, ऊस आणि धानचा प्रसाद चढवणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण मिळावं यासाठी आमची लढाई सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. मेरा देश मेरा खून हे अभियान बच्चू कडू यांनी सुरू केला असून या देशाच्या स्वतंत्र साठी हिंदू, मुस्लिम, दलित या सगळ्यानी बलिदान दिले आहे..शेतकऱ्यांच समाधान करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. देशात 75 वा अमृत महोत्सव साजरा करत असताना शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं नाही. गरिबीचं प्रमाण वाढलं आहे. बहुसंख्य लोक गरिबच राहिले आहे.
प्रभू रामचंद्रला कापूस, तूर, सोयाबीन, ऊस आणि धानचा प्रसाद
देशात 65 टक्के शेतकरी आणि शेतमजूर आहे. तर देशाच्या आणि राज्याच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना व्यवस्थित हिस्सा मिळत नाही त्यामुळे प्रत्येक समाज आरक्षनासाठी आक्रमक होत आहे.. त्यात जातीत तेढ निर्माण होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण मिळावं अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. यासाठी अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन बच्चू कडू दर्शन घेऊन प्रभू रामचंद्रला कापूस, तूर, सोयाबीन, ऊस आणि धानचा प्रसाद चढवणार आहे.
लखनौ विमानतळावर बच्चू कडू यांचे जोरदार स्वागत
दरम्यान लखनौ विमानतळावर बच्चू कडू यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय किसान क्रांती दलाच्या वतीने अमरेश मिश्रा यांच्या वतीने बच्चू कडू यांच स्वागत करण्यात आले. आज बच्चू कडू यांची अयोध्येत जाहीर सभा होणार आहे तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बच्चू कडू काय बोलणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय.
हे ही वाचा :