जालना (आंतरवाली सराटी) : सरकारशी कोणताही संवाद झाला नसून, त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळाली नाहीत. त्यांच्याकडून कसे उत्तर घायचे यासाठी आणखी दोन-तीन दिवस वाट पाहणार आहे. त्यांना माणुसकी समजत नसेल तर त्यांना उत्तर मराठाच आहे. दोन दिवसांत आरक्षण मिळणार असल्याचे तानाजी सांवत म्हणत असतील, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन दिवसांत आरक्षण मिळणार असल्याचे का म्हणत नाही. त्यांनी लगेच याबाबत सांगावे, असे जरांगे म्हणाले आहेत. 


मिडियाच्या कॅमऱ्यासमोर चर्चा होत नसते, समोरासमोर येऊन चर्चा केली पाहिजे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, “त्यांच्या कानात बोळे घातले आहे का? मग मी काल काय म्हणालो होतो. तुम्ही चर्चेला या मराठे तुम्हाला अडवणार नाही असे मी म्हणालो आहे. पण फक्त एकदाच चर्चा होणार. जोपर्यंत मला बोलता येत आहे, तोपर्यंत चर्चेसाठी यायले पाहिजे. त्यानंतर येऊन काही फायदा नाही. आमचे मराठे तुम्हाला कुठेच अडवणार नाही. आरक्षण द्यायचे की नाही एकदाच येऊन सांगायचे, बाकीची वळवळ करायची नाही, असे जरांगे म्हणाले. 


आंतरवालीत गर्दी वाढली...


मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यामुळे राज्यभरातील मराठा समाजातील बांधव आंतरवाली सराटी गावात गर्दी करतांना पाहायला मिळत आहे. सोबतच परिसरात असलेल्या गावातील गावकरी देखील उपोषणास्थळी येत आहे. आज पाचव्या दिवशी तर सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी करायला सुरवात केली. तसेच, सकाळपासून सरकार किंवा प्रशासनाच्या वतीने कोणत्याही हालचाली होतांना दिसत नसल्याने गर्दी आणखी वाढत आहे. तसेच, जरांगे यांची प्रकृती खालवत असल्याने उपोषणास्थळी असलेल्या मराठा बांधवांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. 


पाणी पिण्यास नकार... 


मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. या काळात त्यांनी अन्न,पाणी घेण्यास देखील नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. तर, गावतील नागरिकांकडून त्यांना सतत पाणी पिण्याची विंनती केली जात आहे. सोबतच, छत्रपती संभाजीराजे यांनी देखील फोन करून जरांगे यांना पाणी घेण्याची विनंती केली. मात्र, आता आपण आरक्षण मिळेपर्यंत पाण्याचा घोट देखील घेणार असल्याचं जरांगे यांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maratha Reservation : जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवावा, मराठा आरक्षणावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?