मुंबई : मुंबईतील इंदू मिलच्या जागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या आराखड्याला समितीने मंजुरी दिली आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखालील एकसदस्यीय समितीने याला हिरवा कंदील दाखवला.


 

या स्मारकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फूट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. तसंच आर्ट गॅलरीमध्ये बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित कलाकृतीही मांडल्या जाणार आहेत.

 

यापूर्वीच्या आराखड्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची 80 फूट इतकी प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र नव्या आराखड्यात ही उंची 350 फूट इतकी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे हा पुतळा अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही उंच असेल.

 

बाबासाहेबांचं स्मारक हे संसदेच्या प्रतिकृतीप्रमाणेच दिसेल. तसंच या स्मारकाला सांचीसारखे स्तूपही असतील.