Jayant Patil: आम्हाला राजकरण करायचं नाही, पण महाराष्ट्र  (Maharashtra) अत्यंत गंभीर वळणावर आहे. महाराष्ट्र असुरक्षित होत असून, महाराष्ट्राचा बिहार (Bihar) होत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं. कायदा सुव्यस्था नसल्यामुळं गुंतवणीकीवर परिणाम होत असल्याचेही ते म्हणाले. कोणीही येतं आणि गोळ्या घालतं. घटना झाल्यावर आरोपी पकडणं म्हणजे न्याय मिळाला असं नाही. हे सगळ्याचं फेल्युअर असल्याचे जयंत पाटील म्हणाले. 


महाराष्ट्रात कमकुवत यंत्रणा


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटेनवर देखील जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. Y+ सुरक्षा असूनही, पोलिस शो साठी आहेत का? असा प्रश्न पडतो. महाराष्ट्रात कमकुवत यंत्रणा झाल्याचे पाटील म्हणाले. नागपुरात पोलिस स्टेशनमध्ये पोलीस पत्ते खेळतात. सगळीकडे गुन्हेगारी वाढत आहे. महिलांना सुरक्षा देण्यात सरकार अपयशी ठरल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं 


राज ठाकरेंचा नेमका विरोधक कोण हे त्यांनी ठरवावं


दरम्यान, राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला देखील जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. शरद पवार यांना कधी फोडाफोडीची गरज कधी भासली नाही. राज ठाकरेंचा नेमका विरोधक कोण हे त्यांनी ठरवावं. त्यांची गन सगळीकडे फिरत असते, असेही जयंत पाटील म्हणाले. 


नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे? 


शरद पवार बोलताना सांगतात की, आमचा पक्ष फोडला. मात्र माझा त्यांना प्रश्न आहे की, तुम्ही आयुष्यभर काय केलं? 1978 साली काँग्रेस फोडली. 1991 साली शिवसेना फोडली, नंतर नारायण राणेंचे प्रकरण झालं. त्यामुळे तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी करत आहात. असा सवाल करत राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर तोफ डागली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावतीने आज (13 सप्टेंबर) राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा घेत आहेत. या मेळ्यावातून राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य करत चौफेर फटकेबाजी केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.


महत्वाच्या बातम्या:


Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकींच्या निर्घृण हत्येनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर सुरक्षा वाढवली