मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी योध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी एक लाख 1 रुपयांची देणगी दिली आहे.


देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात हा धनादेश त्यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरीजी महाराज यांना सुपूर्द केला. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून या अभियानाचा प्रारंभ 15 जानेवारी रोजी झाला होता. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभरात घरोघरी जाऊन निधी संकलनाचे अभियान सुरू आहे. 27 फेब्रुवारीपर्यंत हे देशव्यापी अभियान सुरू राहणार असून 12 कोटी कुटुंबांशी संपर्काचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर साकार होतेय. यानिमित्ताने एकप्रकारे आपल्या सर्वांची स्वप्नपूर्तीच होते आहे. आज या एका ऐतिहासिक आणि राष्ट्रीय अस्मितेच्या कार्यासाठी मला निधी समर्पित करता आला, हे मी माझे भाग्य समजतो. आपणही सारे या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.


या वर्गणी अभियानातून जमा झालेल्या वर्गणीतून अयोध्येत भव्य असे राम मंदिर उभारण्याचा मानस ट्रस्टच्या वतीनं व्यक्त करण्यात आला आहे. या अभियानात 10 रुपये, 100 रुपये आणि 1000 रुपये अशा स्वरुपात वर्गणी गोळा करण्यात येत असून वर्गणी दिलेल्यांना त्याची पावती तसेच मंदिर आणि भगवान रामाचे एक चित्र देण्यात येणार आहे.


राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले असून मंदिर 1000 वर्ष टिकावे या दृष्टिकोनातून दगड आणि तांब्याचा उपयोग करत ते बांधले जाणार आहे अशीही माहिती मिळते.


संबंधित बातम्या :



Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिरासाठी गौतम गंभीरने दिली एक कोटी रुपयांची देणगी


Ram Mandir | राम मंदिराच्या उभारणीसाठी कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून 1 लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश


Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिरासाठी वर्गणी अभियानाला सुरुवात, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिले पाच लाख रुपये