Ayodhya Ram Mandir Opening Ceremony: अयोध्या : अयोध्येत (Ayodhya) उभारण्यात आलेल्या भव्य प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा (Shri Ram Mandir) उद्घाटन सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. डोळे दिपवणारा हा सोहळा याचि देही याची डोळा पाहण्यासाठी प्रशासनाकडून अनेक मान्यवरांना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. तसेच, देशभरातील जनतेलाही रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अशातच महत्त्वाची बाब म्हणजे, भाजपच्या (BJP) काही आमदारांना अयोध्येत लोकांना नेण्यासाठी टार्गेट देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भाजपच्या या नव्या कल्पनेमुळे देशभरातील विविध मतदारसंघातील लाखो नागरिकांना विधानसभा निवडणुकीपर्यंत अयोध्येला नेणं शक्य होणार आहे. 


भाजपच्या आमदारांना अयोध्येत नागरिकांना नेण्यासाठी टार्गेट देण्यात आलं आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनानंतर राज्यातील भाजप आमदारांनी पुढील काही महिन्यात त्यांच्या मतदारसंघातून किमान पाच हजार नागरिकांना अयोध्येला नेण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ही प्रक्रिया 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर लगेच सुरू होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. यासाठी आवश्यक याद्या तयार करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. एकदा यादी तयार झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर रेल्वे गाड्या बुक केल्या जाणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे विविध मतदारसंघातील लाखो नागरिकांना विधानसभा निवडणुकीपर्यंत अयोध्येला नेणं शक्य होणार आहे. या गाड्यांना 'राम दर्शन विशेष ट्रेन' असं नाव देण्याचाही विचार सुरू आहे. 


भाजपच्या आमदारांना नेमकं काय टार्गेट देण्यात आलंय? 



  • अयोध्येत राम मंदिराच्या उदघाटनानंतर राज्यातील भाजप आमदारांनी पुढील काही महिन्यात त्यांच्या मतदारसंघातून किमान पाच हजार नागरिकांना अयोध्येला नेण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.

  • संबंधित प्रक्रिया 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर लगेच सुरू होणार असल्याची ही माहिती आहे.

  • प्रत्येक आमदाराला त्यांच्या मतदारसंघातून कमीत कमी पाच हजार नागरिकांना अयोध्या मंदिराच्या दर्शनासाठी नेण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. यासाठी

  • आवश्यक याद्या तयार करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. 

  • एकदा यादी तयार झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानं ही प्रक्रिया पार पडणार आहे. 

  • त्यासाठी मोठ्या प्रमाणावर रेल्वे गाड्या बुक केल्या जाणार असल्याची ही माहिती आहे.

  • त्यामुळे विविध मतदारसंघातील लाखो नागरिकांना विधानसभा निवडणुकीपर्यंत अयोध्येला नेणे शक्य होणार आहे. 

  • या गाड्यांना 'राम दर्शन विशेष ट्रेन' असे नाव देण्याचा ही विचार सुरू आहे.


अयोध्या नगरी सजली


रामलल्ला (Ram Lalla) प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय भव्य-दिव्य सोहळा करण्यासाठी राम मंदिर ट्रस्टकडून (Ram Mandir Trust) जोरदार तयारी सुरु आहे. देशभरातील प्रभू श्रीरामाचे भक्त अयोध्येत (Ayodhya Ram Mandir) दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टकडून तयारी सुरु आहे. राम मंदिर ट्रस्टच्या मते, एका दिवसात सुमारे 75,000 भक्त राम मंदिरात दर्शन घेऊ शकतील, अशी माहिती देण्यात आली आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या बांधकामासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या खजिन्यातून एक रुपयाही खर्च झालेला नाही. 


रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरला


श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे सदस्य नृपेंद्र मिश्रा यांनी माहिती देत सांगितलं की, मंदिराच्या पहिल्या टप्प्याचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. 14 ते 15 जानेवारी या कालावधीत संत आणि ऋषीमुनींच्या हस्ते अभिषेकासह प्राणप्रतिष्ठेला सुरुवात होणार आहे. 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान कोणत्याही दिवशी या सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. पंतप्रधान मोदी अयोध्या दौऱ्याबाबत अद्याप कोणतीही निश्चित तारीख झालेली नाही.