नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने पोलिसांच्या पगाराच्या खात्याबाबतच्या केसमध्ये नोटीस बजावली आहे. या प्रकरणात फडणवीस यांना चार आठवड्यात उत्तर द्यायला सांगितले आहे. 


2019 साली जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा तमोहनीश जबलापुरे नावाच्या व्यक्तीने त्यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका केली होती.  मुख्यमंत्रीपदाचा गैरवापर करून फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस ज्या ॲक्सिस बँकेत उच्च पदावर नोकरीला आहेत, त्या बँकेला फायदा पोहचवण्याचा प्रयत्न केला, असे त्यांचे म्हणणे आहे.   याचिका दाखल होण्यापूर्वी हायकोर्टाने फडणवीसांना नोटीस बजावली  होती.  जी पत्ता बदलल्यामुळे त्यांच्यापर्यंत तेव्हा पोहोचू शकली नाही. दरम्यानच्या काळात यामध्ये पुढे काही झाले नाही. आता परत एकदा याचिका दाखल करण्याअगोदर पत्ता सुधारित करून ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. 


काय आहेत आरोप?


 फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा गैरवापर करून पोलिसांचे पगाराचे खाते ॲक्सिस बँककडे वळवले


 तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे खाते सुद्धा ॲक्सिस बँकेला दिले


ॲक्सिस बँकेत त्यांची पत्नी अमृता फडणवीस या उच्च पदावर कार्यरत आहे


 यासाठी 2017 चे सरकारचे एक सर्क्युलर याचिकाकर्त्यांना पुरावा म्हणून सादर केले आहे


असे केल्यामुळे ही खाती आधी ज्या राष्ट्रीयीकृत बँकांकडे होती त्यांना नुकसान झाले असून हा निर्णय परत  घेत चौकशी करावी अशी या याचिकेत मागणी आहे 


 महत्वाचं आहे की, अजून कोर्टाने याचिका दाखल करून घेतलेली नसून, ही नोटीस बिफोर अॅडमिशन आहे. याआधी या प्रकरणावर फडणवीसांच्या बाजूना आलेल्या स्पष्टीकरण असं सांगण्यात आलं होतं की, ही खाती साल 2005 पासून यूटीआय बँकेकडे होती. जिचे नाव नंतर ॲक्सिस बँक झाले. त्यामुळे हा निर्णय झाला तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री नव्हते. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्त्वाच्या इतर बातम्या :