यवतमाळ : राळेगाव तालुक्यातील लोणी शिवारात सावज म्हणून लावलेल्या बकरीची बछड्यांनी शिकार केली आहे. परवाच्या दिवशी याच दोन बछड्यांनी सावज म्हणून जंगलात लावलेल्या एका घोड्याची शिकार केली होती. अवनी वाघीण ठार झाल्यावर बछड्यांची उपासमार होऊ नये म्हणून वन विभागाने अनेक ठिकाणी सावज म्हणून बकरी, घोडे लावलेले आहेत.

आज त्यांनी लोणी शिवारातील सावज म्हणून लावलेल्या बकरीची शिकार केली आहे. त्यामुळे आता पुन्हा बछडे स्वतः शिकार करून जगत असल्याचं पुन्हा पुढे आले आहे. विशेष म्हणजे आज खैरगाव आणि चिखलीच्या मधोमध असलेल्या एका शेतामध्ये बछड्यांच्या पायाचे ठसे आढळून आलेले आहेत.

नरभक्षक अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर तिच्या दोन बछड्यांचे काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. परंतु अवनीच्या दोन बछड्यांनी शिकार केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अवनीचे बछडे उपाशी मरणार नाहीत, असे बोलले जात आहे. अवनीच्या बछड्यांनी केलेल्या या शिकारीमुळे वन विभागाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

यवतमाळमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक वाघिणीला काही दिवसांपूर्वी वन विभागाच्या पथकाने ठार मारले. तिचे दोन बछडेदेखील आहेत. या दोन्ही बछड्यांना शिकार करता येत नाही, शिवाय त्यांच्या पालन पोषणासाठी अवनीदेखील जिवंत नाही. त्यामुळे या दोन बछड्यांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु बछड्यांनी केलेल्या शिकारीमुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.

अवनीचे बछडे केवळ 11 महिन्यांचे आहेत. बछडे 10-11 महिन्यांचे झाल्यानंतर वाघीण बछड्यांना शिकार कशी करायची ते शिकवते. परंतु अवनीचे बछडे अद्याप शिकार कशी करायची हे शिकलेले नाहीत. त्यामुळे अवनीच्या बछड्यांना जिवंत पकडण्याचे आव्हान वन विभागासमोर होते. परंतु अवनीला ठार केल्यानंतर वन विभाग अवनीच्या बछड्यांना शोधण्यात अपयशी ठरला होता.

संबंधित बातम्या



यवतमाळमधील नरभक्षक टी1 वाघीण अखेर ठार


अवनीला थेट गोळ्या घातल्या, कथित वन कर्मचाऱ्यांची ऑडिओ क्लिप


बिर्ला, अंबानींच्या उद्योगांसाठी अवनी वाघिणीचा बळी : जयंत पाटील


टी 1 वाघिणीच्या बछड्यांना वाघासह वन्य प्राण्यांचा धोका


टी-1 वाघिणीची हत्याच, मनेका गांधींचं मुनगंटीवारांवर शरसंधान


मनेका गांधींच्या टीकेला सुधीर मुनगंटीवार यांचं उत्तर


वन खात्याचं नाव बदलून शिकारी खातं करा: आदित्य ठाकरे