ठाण्यात रिक्षाचालकांची मुजोरी कायम, पुन्हा तरुणीला मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 07 Jul 2017 01:31 PM (IST)
ठाणे: ठाण्यातील रिक्षाचालकांची मुजोरी काही केल्या कमी येत नसल्याचं चित्र आहे. कारण आजही एका रिक्षाचालकाने एका तरुणीला मारहाण केली आहे. गावदेवी परिसरातून चरई येथे कामावर जात असताना, रिक्षाचालकाने दुसऱ्या बाजूने रिक्षा नेली. त्याबाबत विचारणा केल्यामुळे तरुणीची आणि रिक्षाचालकाची बाचाबाची झाली. यानंतर रिक्षाचालकाने थेट तरुणीच्या कानशिलात लगावली. या मारहाणीमुळे तरुणी खाली कोसळली. याबाबतची माहिती मिळताच ठाणे नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, रिक्षाचालकाला ताब्यात घेतलं. दरम्यान, ठाण्यात बुधवारीही अशीच घटना घडली होती. त्यावेळीही रिक्षाचालकाने एका तरुणीला मारहाण केली होती. तसंच तरुणीचा विनयभंगही झाला होता.