खड्ड्यावर गुन्हा नोंदवून अटक करा, वाहनचालकाची पोलिसात तक्रार
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 01 Aug 2016 03:54 PM (IST)
औरंगाबाद : राज्यभरातील जनता खड्ड्यांमुळे हैराण झाली आहे. आंदोलने, विनंत्या करुनही खड्डे बुजवले जात नाहीत, रस्ता दुरुस्त केला जात नसल्यामुळे सर्वसामान्यांचा जीव जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता औरंगाबादमध्ये खड्डयावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी एका नागरिकांनी केली आहे. औरंगाबादमध्ये एका वाहनचालकाने पोलिसात ही अजब तक्रार नोंदवली आहे. भारत फुलारे नावाच्या व्यक्तीने चक्क एका खड्ड्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने खड्डयावरच गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. या संदर्भात औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. खड्ड्याला अटक करुन कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्याने केली आहे.