औरंगाबाद : बेरोजगारीला कंटाळून औरंगाबादमध्ये मराठा तरुणाने आत्महत्या केली आहे. महत्त्वाचं म्हणजे मी मराठा आहे म्हणून मला नोकरी मिळत नाही की काय? असा सवाल त्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये उपस्थित केला आहे. औरंगाबाद शहरातील चौधरी कॉलनी येथील ही घटना घडली आहे.
उमेश इंडाईत असं या 21 वर्षीय तरुणाचं नाव आहे. "मी माझ्या मम्मी-पप्पांची क्षमा मागतो. मला त्यांनी शिकवले, पण मी त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. माझं शिक्षण अपूर्णच राहिले. बी.एस्सी. होऊनही मला नोकरी मिळत नाही, मी मराठा आहे म्हणून मला नोकरी मिळत नाही काय?", असं सवाल निराश झालेल्या उमेशने आपल्या सुसाईड नोटमध्ये विचारला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनदरम्यान सहावी आत्महत्या
31 जुलै- बीडमध्ये 35 वर्षीय अभिजीत देशमुखनं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली.
30 जुलै- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबादमध्ये मुकुंदवाडी इथे राहणाऱ्या प्रमोद होरे पाटील या 31 वर्षीय तरुणाने रेल्वेसमोर उडी घेऊनआत्महत्या केली. विशेष म्हणजे प्रमोदने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर मराठा आरक्षण मिळावं, यासाठी आत्महत्या करत असल्याची पोस्ट लिहिली होती.
29 जुलै- नांदेडमधील दाभड येथील कचरु दिगंबर कल्याणे या 42 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
24 जुलै- औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील देवगाव रंगारी येथील जगन्नाथ सोनवणे यांनी विष प्राशन केल. उपचारादरम्यान त्यांचा 25 जुलैला मृत्यू झाला.
22 जुलै- औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका गावात काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी मारुन आत्महत्या केली होती.
संबंधित बातम्या
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या, फेसबुक पोस्ट लिहून रेल्वेसमोर उडी
मराठा आरक्षणासाठी गोदावरीत उडी मारणारा काकासाहेब शिंदे कोण होता?
काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार, मोर्चेकऱ्यांनी चंद्रकांत खैरेंना हाकललं