औरंगाबाद : पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही औरंगाबादमध्ये शिवसेनेने पोलिसांविरोधात मोर्चा काढला. शहरातील पैठण गेट भागातून हा मोर्चा काढण्यात आला. मात्र एसबी कॉलेजजवळच हा मोर्चा अडवण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा जाणार होता.


शिवसेनेच्या या मोर्चाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. औरंगाबाद शहरातील हिंसाचारानंतर पोलिसांनी हिंसाचारात सहभागी असलेल्या लोकांवर कारवाई सुरु केली आहे. मात्र, दंगल शिवसैनिकांनी रोखली असताना शिवसैनिकांनाच अटक केली जात असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे.

औरंगाबादचा हिंसाचार हा पोलिसांच्या चुकीमुळे वाढला, असा आरोपही शिवसेनेने केला आहे. त्यामुळेच हा मोर्चा काढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

काय आहे प्रकरण?

औरंगाबादमधील मोतीकारंजा परिसरात 11 मे रोजी किरकोळ कारणांवरुन दोन गटात वाद झाले. या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत जाळपोळ केली. दुकानांबाहेरील कूलर, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. राजा बाजार भागात जवळपास 25 दुकाने जाळण्यात आली आहेत. या घटनेत आतापर्यंत 30 ते 40 जण जखमी झाले आहेत. तर यात दोघांचा मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या :

औरंगाबादमध्ये दोन गट भिडले, घरं आणि दुकांनांचं नुकसान

औरंगाबाद का धुमसलं? जाळपोळीची कारणं काय?