औरंगाबाद : गेल्या दोन महिन्यांपासून औरंगाबादकरांची कचरा कोंडीतून सुटका करण्यात महापालिकेला अपयश आलं आहे. आता तर महापालिका प्रशासनाने कहरच केला. चक्क ऐतिहासिक वास्तू असलेल्या टाऊन हॉल शेजारील बॅडमिंटन हॉलमध्येच हा कचरा भरण्याची शक्कल लढवण्यात आली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गेले दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर होते. औरंगाबादच्या रस्त्यांवर पडलेला कचरा पाहून त्यांनी पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आणि दहा दिवसात औरंगाबादचा कचराप्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले.

उद्धव ठाकरे यांना रस्त्यावरील कचरा दिसू नये म्हणून महापालिकेने ऐतिहासिक वास्तू शेजारी कचरा साठवण्याची शक्कल लढवली असावी, असाही अंदाज बांधला जात आहे. मात्र औरंगाबादकरांकडून या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महापालिकेने या बॅडमिंटन हॉलमधील कचरा बाहेर काढला आहे.

नारेगावच्या डेपोत आधी औरंगाबाद शहराचा कचरा टाकला जायचा, मात्र त्यांनी आता कचरा टाकू देण्यास विरोध केल्याने औरंगाबाद महापालिकेला अजून दुसरी पर्यायी जागा शोधण्यात यश आलेलं नाही.

संबंधित बातम्या :

‘यापुढे नारेगावात कचरा टाकू नये’, औरंगाबाद कचराप्रकरणी कोर्टाचा निर्णय

पोलिसांकडूनच नागरिकांवर दगडफेक, शिवसेना आमदाराचे गंभीर आरोप

औरंगाबाद कचरा प्रश्न : आंदोलकांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

औरंगाबादमधील कचरा प्रश्नाला हिंसक वळण, ग्रामस्थांकडून पोलिसांवर दगडफेक

औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता तोडगा

डम्पिंग ग्राऊंडसाठी जमीन देणार नाही: मुख्यमंत्री

18व्या दिवशीही औरंगाबादमधील कचराकोंडी कायम

औरंगाबादेतील कचराकोंडीचा 17 वा दिवस, आमदार सावेंची गाडी अडवली

औरंगाबादचा कचरा, गावकऱ्यांनी कचऱ्याची गाडी फोडली

कचराप्रश्न पेटलेल्या औरंगाबादेतील दोन चकचकीत वॉर्ड