औरंगाबादेत महेश काळेंचा निरागस सूर, तर पुण्यात सुरेल मैफल
एबीपी माझा वेब टीम | 28 Oct 2016 07:52 AM (IST)
पुणे/औरंगाबादः राज्यभरात दिवाळी पहाटच्या सुरांचा आवाज घुमत आहे. औरंगाबादच्या रुख्मिणी सभागृहात दिवाळी पहाटसाठी महेश काळेंच्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. तर पुण्यात प्रशांत दामले, मधुरा दातार, ऋषिकेश रानडे यांचा दिवाळी पहाटचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महेश काळेंच्या कार्यक्रमासाठी रसिकांनी प्रचंड गर्दी केली. महेश काळेंच्या 'सूर निरागस हो..' गाण्याने रुख्मिणी सभागृह आणि परिसर मंत्रमुग्ध झाला होता. पुण्यात प्रशांत दामले, मधुरा दातार आणि ऋषिकेश रानडे यांनी रसिकांची दिवाळी पहाट सुरमयी केली.