दिल्लीत 20 नोव्हेंबरला मराठा मोर्चा होणार, आयोजक उद्या पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा करणार

मुंबईः संभाजी ब्रिगेडकडून 'ऐ दिल है मुश्किल'चा निषेध, कल्याणमधील सर्वोदय मॉलमध्ये चित्रपटाच्या विरोधात निदर्शनं

कल्याणः किल्ला बनवताना विजेचा शॉक लागून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, कल्याण पूर्वमधील हनुमान नगर भागातील घटना

मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर वरसोली टोल नाक्याजवळ अपघात, मुंबईकडे जाणारी वाहतूक संथगतीने

सकाळच्या हेडलाईन्सः

  1.  212 नगर पालिकांसाठी सेना-भाजपचं सुत जुळलं, दानवे आणि राऊतांची घोषणा, मात्र महापालिकेच्या युतीबद्दल अद्याप निर्णय नाही


----------------------

  1. हेरगिरी प्रकरणी पाकिस्तानातील भारतीय अधिकाऱ्याला देश सोडण्याचे आदेश, अधिकाऱ्याकडे संरक्षण मंत्रालयाची गोपनीय कागदपत्र असल्याचा आरोप, तर दोन भारतीयांना अटक


-------------------

  1. सायरस मिस्त्रींनी संचालक मंडळाचा विश्वास गमावला, सायरसच्या आरोपांना टाटांचं उत्तर, मात्र शेअर बाजारात पडझड


-------------------

  1. 4. पालघरजवळील सातवलीमधून 15 किलो स्फोटकं जप्त, दिवाळीच्या तोंडावर एटीएसची कारवाई, प्रकरणाची चौकशी सुरु


----------------

  1. कोकणात सुनील तटकरेंविरोधात भास्कर जाधवांचं रणशिंग, पक्षात डावललं जात असल्यानं तीव्र नाराजी, चिपळूणमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन


----------------

  1. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई द्या, मुंबई हायकोर्टाचे आदेश, राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश


------------------

  1. दिवाळीनिमित्त पुणे, औरंगाबादेत दिवाळी पहाटचं आयोजन, तर सूरतमधल्या हीरे व्यापाऱ्याकडून 1200 कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त कारची भेट