औरंगाबाद : औरंगाबादमध्ये जिल्हा सत्र न्यायालयात दोन वकिलांमध्ये तुफान हाणामारी झाली. हा सगळा प्रकार जिल्हा कोर्टाच्या वकील कक्षात घडला.

जिल्हा कोर्टात मनोहर लोखंडे आणि रघुनंदन जाधव यांच्या आजूबाजूला बसण्यासाठी खुर्च्या आहेत. मनोहर लोखंडे यांनी रघुनंदन जाधव यांची खुर्ची एक पक्षकाराला बसण्यासाठी दिली. याच कारणावरुन दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन याचं पर्यावसन मारहाणीत झालं.

रघुनंदन जाधव नावाच्या वकिलाने रुमालामध्ये दगड गुंडाळून मला आणि माझी पत्नी कविताला जबर मारहाण केल्याचा आरोप, मनोहर लोखंडे यांनी केला आहे.

दरम्यान या मारहाणीत मनोहर लोखंडे यामध्ये रक्तबंबाळ झाले असूनत्यांच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहे.