VIDEO : औरंगाबादमधील अग्नितांडवाची एक्स्लुझिव्ह दृश्यं
एबीपी माझा वेब टीम | 29 Oct 2016 04:17 PM (IST)
औरंगाबाद : औरंगाबादच्या जिल्हा परिषदेच्या परिसरात फटक्यांची जवळपास 200 दुकानं जळून बेचिराख झाली. सकाळी साडे अकराच्या सुमारास फटाक्यांच्या दुकानांनी अचानक पेट घेतला. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने आगीची भीषणता काही क्षणातच जाणवून दिली. या आगीत शेकडो मोठ्या प्रमाणावर चारचाकी आणि दुचाकींचा अक्षरश: कोळसा झाला. ही भीषण आग लागली तेव्हाची एक्स्लुझिव्ह दृश्ये एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. पाहा व्हिडीओ